कोकणस्थ मराठा विवाह संस्थात आपल्या मुलाचे / मुलीचे नाव नोंदविल्याबद्दल धन्यवाद
१ ) कोकणस्थ मराठा विवाह संस्थात ऑनलाइन पद्धतीने सदस्याने पुरविलेल्या माहितीनुसार नोंदणी केली जाते .सोबत सदस्याचा त्यांनी दिलेला फोटो वेबसाईट वर अपलोड केला जातो. (गॉगल आणि टोपी नसलेला )
२ ) नोंदणी प्रक्रिया अर्ज भरून अथवा ऑन लाईन असल्याने सदस्याने जोडीदाराचा शोध मनमीत च्या वेबसाईट वर लॉग इन करून यूजर नेम आणि पास वर्ड च्या साहाय्याने घ्यायचा आहे . उपलब्ध असलेल्या सर्व स्थळांची माहिती साईट वर असल्याने केंद्र विशिष्ट्य स्थळ सुचवत नाही. सदस्याने स्वतः पुढाकार घेऊन समोरील स्थळांना संपर्क करणे अपेक्षित आहे. केंद्र व्यवस्थापन उभय पक्षात कोणतीही मध्यस्ती करत नाही. समोरील स्थळाच्या अवांतर माहिती ची खातरजमा ज्याने त्याने स्वतः करून घेणं योग्य ठरतं , केंद्राची या बद्दल काही हरकत नाही.
३ ) सदस्य उमेदवारीच्या काळात वयक्तिक पातळीवर तसेच इतर मंडळाच्या सदस्यत्वानुसार विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करीत असतो., त्यामुळे आमच्या मंडळाकडून अथवा इतर मंडळांकडून विवाह ठरल्यास, विवाह ठरल्याबद्दल आम्हास कळवण्याची जबाबदारी सदस्याची आहे जेणेकरून त्याचे नाव आमच्या वेबसाईट वरून कमी करण्यात येईल.. ज्यामुळे त्यांना इतर स्थळांचे फोन येणे थांबेल.
४ ) वर्षाच्या कालावधीत केवळ २ वेळा फोटो बदलायची सुविधा दिली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
५ ) आपण करीत असलेली नोंदणी तात्कालिक उपलब्ध असलेल्या स्थळांची आणि आगामी स्थळे निवडण्यासाठी केली आहे. साईट वरील सर्व स्थळे आपल्या पसंतीची/समोरच्यांच्या पसंतीची असतील असे नाही. त्यामुळे मंडळास अनुरूपतेसाठी जबाबदार ठरवू नये.
६ ) नोंदणी करताना भरलेली नोंदणी फी कोणत्याही कारणास्तव परत दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.
७ ) केंद्र पुरवीत असलेल्या इतर अधिक सेवा या फी भरून स्वीकारायच्या आहेत.आणि हि फी आगाऊ भरायची आहे. (ADDITIONAL SERVICES )
८ ) मंडळाकडून आपणास जोडीदार मिळण्यासाठी अनेक उत्तम शुभेच्छा . धन्यवाद !
कोकणस्थ मराठा विवाह संस्था